ल. ना. होशिंग विद्यालयाची आषाढी दिंडी भक्तिमय वातावरणात संपन्न
शहरातील विविध ठिकाणी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत व पूजन; गोल रिंगणाने वेधले सर्वांचे लक्ष
जामखेड प्रतिनिधी,
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. वारकरी वेषातील विद्यार्थी, विठ्ठलनामाचा गजर, अभंग, टाळ-मृदुंगाच्या निनादात दिंडीने शहरातून मार्गक्रमण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील आकर्षक गोल रिंगण हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
दिंडीत ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्था, राजुरी येथील विद्यार्थी तसेच मार्गदर्शक प्रमोद महाराज भांडवलकर यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिक धार्मिक व सांस्कृतिक रंग प्राप्त झाला. तसेच नारायण महाराज दौंड यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप गुगळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. दिंडीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
दिंडीला प्रारंभ करण्यापूर्वी संस्थेचे सचिव अरुणशेठ चिंतामणी व उपाध्यक्ष दिलीप गुगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेविका सीमा कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, उद्धवराव देशमुख, शिवाजी कासार, जयश्री देशमुख, डॉ. सुनील कटारिया दाम्पत्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत व पूजन केले.
दिंडीत विठ्ठलाची भूमिका शौर्य मासाळ तर रुक्मिणीची भूमिका शिवन्या देवकर यांनी साकारून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख व माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, उमाकांत कुलकर्णी, मुकुंद राऊत, हनुमंत वराट, स्वप्निल जाधव, बापू जरे, विजय क्षीरसागर, बाबासाहेब समुद्र, गणेश नेटके, साई भोसले, प्रा. सतिश डुचे, स्वप्नाली घाडगे, आर. एस. कारंडे, एस. बी. हंगे, एम. जे. जाधव, एल. एम. सोळंकी, एस. बी. दराडे, एस. वाय. घायतडक, एस. व्ही. भोंडवे, व्ही. एस. अल्हाट, प्रियंका सुपेकर, लंघे (पी.टी.) यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य बी. ए. पारखे यांनी आभार मानताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धार्मिक, सांस्कृतिक व मूल्यसंस्कार देणारे उपक्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
![]()
