मोहागड रेणुका माता येथे कोजागिरी निमित्त महानवचंडी यज्ञ व कीर्तन महोत्सव संपन्न

रेणुका माता मंदिर येथे तलावरून पाणी आणल्याबद्दल आभार मानले

मोहा प्रतिनिधी,

जामखेड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य अशा मोहा गडावर रेणुकामाता मंदिर येथे वे. शा. स. पांडुरंग शास्त्री देवा देशमुख सौताडा यांच्या कृपाशीर्वादाने व वै. विठ्ठल आण्णा राऊत यांच्या प्रेरणेने तसेच हभप राजेंद्र महाराज झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ पासून दि. २८ पर्यंत नवचंडी महायज्ञ व किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

आज हभप रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली.
मागील वर्षी काल्याच्या किर्तनात आमदार रोहित पवार यांनी गडावर पिण्याच्या पाण्याची सोय करतो असा शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केला आहे. पाण्याची पाईपलाईन व पंचवीस हजार लीटर पाण्याची टाकी बांधुन दिली आहे. दिलेला शब्द खरा केला म्हणून मोहा गड ग्रामस्थांच्या व सप्ताह समितीच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.

दि. २६ रोजी हभप ईश्वरी महाराज नागरगोजे बालकीर्तनकार यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ बीड येथील हभप प्रतिभाताई महाराज गायकवाड यांचे किर्तन झाले.

शुक्रवार दि. २७ रोजी ज्ञानेश्वरीताई महाराज बोराटे यांचे प्रवचन तर श्रीगोंदे येथील हभप ज्ञानेश्वर महाराज घोडके यांचे किर्तन झाले.

शनिवार दि. २८ रोजी सकाळी आठ वाजता अभिषेक सकाळी ९ ते ११ हभप रामकृष्ण महाराज रंधवे (बापू) उपाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी महामंडळ यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद झाला.

यासाठी विठ्ठल भजनी मंडळ जामखेड, मोहेश्वर भजनी मंडळ मोहा, हभप पंढरीनाथ राजगुरू, भाऊसाहेब कोल्हे, आश्रुबा कोल्हे, अशोक राळेभात, विष्णू म्हेत्रे, संतोष बांगर, विष्णू घुमरे, काशिनाथ डोंगरे, भगवान कुदळे, दत्तु झेंडे, संतोष चौधरी यांच्या सह हार्मोनियम वादक मच्छिंद्र रेडे, दासूभाऊ रेडे, गौतम शिंदे, वैजनाथ ठेंगिल

मृदंगाचार्य हभप प्रविण महाराज भोगिल, बाबा महाराज मुरूमकर, दिलीप बेलेकर
हरीपाठ हभप गाडे महाराज, नामदेव महाराज घुमरे, शंभू महाराज घुमरे, अर्जुन घुमरे, सोमनाथ डोंगरे
काकडा भजन किशोर महाराज जाधव, महादेव महाराज डोंगरे, महादेव महाराज गर्जे
संत गोरोबा काका सेवा आश्रम आळंदी गायनाचार्य हभप शिवाजी भानुदास लोणकर महाराज भजनप्रेमी, विणेकरी हभप हरीभाऊ महाराज जठार देवीनिमगाव
सदर कार्यक्रमास मोहा, हापटेवाडी, नानेवाडी, रेडेवाडी, पांडववस्ती, सौताडा, लेहनेवाडी, भुतवडा, सावरगाव, धोत्री विठ्ठल भजनी मंडळासह जामखेड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *